23 डिसेंबरपासून असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स आणि द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सच्या संयुक्त विद्यमाने “बिल्ड एक्स्पो” या नावाने बांधकाम साहित्य आणि गृहसजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील बागेवाडी यांनी दिली.
धारवाड येथे पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सुनील बागेवाडी म्हणाले की, 23 डिसेंबरपासून असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सच्या संयुक्त विद्यमाने बिल्ड एक्स्पो या नावाने शहरातील कला भवन मैदानावर बांधकाम साहित्य आणि गृहसजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
कामगार मंत्री संतोष लाड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात गृहबांधणी विषयक सर्व साहित्य आणि डिझाइन्स, वास्तुरचना संबंधित वस्तूंचे स्टॉल्स, मार्गदर्शनपर साहित्याची मांडणी करण्यात येणार आहे. स्वतःच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकाच छताखाली सर्व आवश्यक माहिती देण्यात येणार असे, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments