Dharwad

अतिथी व्याख्यात्यांचा धारवाडमध्ये मशाल मोर्चा

Share

गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प वेतनावर काम करणाऱ्या अतिथी व्याख्यात्यांना सेवेत कायम करण्याची मागणी करत धारवाडमध्ये मशाल मोर्चा काढण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकातील प्रथम श्रेणी महाविद्यालयांत सेवा बजावणाऱ्या अतिथी व्याख्यात्यांना सेवेत कायम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. या मागणीसाठी अतिथी व्याख्यात्यांनी अनेकवार आंदोलनेही केली आहेत. मात्र सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधार्थ धारवाडमधील अतिथी व्याख्यात्यांनी बुधवारी सायंकाळी मशाल मोर्चा काढून अतिथी व्याख्यात्यांना सेवेत कायम करण्याची मागणी केली.

शहरातील कला भवन ते कोर्ट सर्कलपर्यंत मशाल मिरवणूक काढत अतिथी व्याख्यात्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.
शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात गेस्ट लेक्चरर गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत आहेत. मात्र त्यांची सेवा सुरक्षित नाही. यामुळे भविष्यात आपले जीवन कठीण होईल. त्यामुळे आम्हाला कायम करण्यात यावे, तसेच बाकीच्या मागण्यांना सरकारने प्रतिसाद द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांना प्रतिसाद देत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Tags: