Dharwad

संभाव्य विजयी उमेदवारालाच धारवाड खासदार निवडणुकीचे तिकीट. : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

लोकसभा निवडणुकीसाठी ,धारवाड मतदार संघाच्या 15 हून अधिक इच्छुकांनी काँग्रेसच्या प्रभारी आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे तिकीट देण्यासाठी अर्ज केले आहेत. तिकीट वाटपात लॉबिंग होणार नाही, असा स्पष्ट संदेश हेब्बाळकर यांनी दिला आहे

धारवाड लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस प्रभारी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शुक्रवारी येथील एका खासगी हॉटेलमध्ये जिल्हा पालक मंत्री, आमदार, पराभूत उमेदवार आणि खासदार तिकीट इच्छुकांची बैठक घेऊन मते जाणून घेतली.

लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून पहिल्यांदाच शहरात आलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे युवक काँग्रेसच्या वतीने टोलनाक्यावर क्रेनच्या सहाय्याने भव्य पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले व तेथून बाईक रॅली काढण्यात आली..

यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या कि , भाजप सरकारमुळे भ्रमनिरास झालेल्या लोकांनी राज्यात काँग्रेसला विजय मिळवून दिला आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूक आपल्या उमेदवारांनी जबाबदारीने जिंकावी. मतदारसंघात इतिहास रचला पाहिजे, धारवाड लोकसभा मतदारसंघात भाजप सलग विजयी होत आहे. सध्याचे खासदार प्रल्हाद जोशी वयाने मोठे असू शकतात. त्यांची ताकद बघण्यापेक्षा आपल्या सरकारच्या हमीयोजनांचा प्रचार करून विजय मिळवला पाहिजे.

आमच्या होमियोजनांना घाबरणाऱ्या भाजपने आता मोदींच्या माध्यमातून हमी योजना जाहीर केल्या आहेत . विधानसभा आणि लोकसभा निवडणुका वेगळ्या आहेत. मोदी हवा दक्षिण भारतात होत नाही. लोकांचा मोदींबद्दल भ्रमनिरास झाला आहे. मोदींच्या हमीविरुद्ध सिद्धरामय्या यांची हमी जिंकली पाहिजे, ‘एका तिकिटासाठी अनेक इच्छुक आहेत. लॉबी करण्याची हिंमत करू नका. संभाव्य विजयी उमेदवारालाच तिकीट दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली

Tags: