Dharwad

शेतकऱ्यांच्या पिकावर बदमाशांची वक्रदृष्टी : शेतकऱ्याचे सुमारे दोन लाखाचे नुकसान

Share

शेतकर्यांच्या कष्टाने पिकवलेल्या मक्याच्या कणसांना अज्ञातांनी आग लावल्याने , शेतकऱ्याचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे .

धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील हनसी गावात ही घटना घडली. चेन्नप्पा हुडकेरी या शेतकऱ्याने आपल्या शेतात कष्टाने आपली याचा एकर १२ गुंठे जमिनीत पिकवलेल्या मक्याची कणसे कापून एकत्रित रास रचून ठेवली होती .

मध्यरात्रीच्या सुमारास बदमाशांनी या मक्याच्या राशीला आग लावली . मक्याला आग लागल्याची माहिती ऐकून शेतकरी
खचून गेला आहे .

जिल्ह्याचे पालकमंत्री संतोष लाड यांनी भेट देऊन न्याय मिळवून देण्याचा आग्रह शेतकरी करीत आहे .
शासनाने व जिल्हा प्रशासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे .

याप्रकरणी नवलगुंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Tags: