धारवाडमध्ये शासकीय परिवहन बसेस वेळेवर सोडाव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको, निदर्शने व सरकारचा निषेध केला.

शहरातील केळगेरीजवळ धारवाड गोवा रोडवर निदर्शने करत विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत परिवहन विभागाचे अधिकारी आणि मंत्री यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. पालक आणि स्थानिक रहिवाशांनीही मुलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलन अधिक तीव्र झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
आठवड्यातील फक्त दोनच दिवस बस वेळेवर येते, बाकीचे दिवस धडपड करावी लागतात. वेळेवर शाळेत जाता येत नाही. शिवाय, यामुळे आमच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. त्यामुळे परिवहन बसमुळे होणारी समस्या लवकरात लवकर दूर करावी. अन्यथा आम्हाला तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा त्यांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्र्यांना दिला


Recent Comments