पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर स्थानिक पुढाऱ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना धारवाडमध्ये घडली आहे.
पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या धारवाडच्या सीबीटीजवळ स्थानिक पुढाऱ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. शहरातील दाट लोकवस्तीत सीबीटी स्टेशनजवळ ही घटना घडली आणि स्थानिकांना धक्काच बसला. हाणामारी झालेले ठिकाण पोलीस ठाण्यापासून अवघ्या 350 मीटर अंतरावर आहे.
तरीही कोणतीही भीती न बाळगता दोन्ही गट एकमेकाशी भांडले. ज्येष्ठ नागरिकांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना दाद न देता तरुणांनी हाणामारी केली. ही घटना धारवाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी कारवाई केल्यानंतरच या पुढार्यांची ओळख पटणार आहे. या घटनेत काहीजण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे, मात्र जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


Recent Comments