Dharwad

धारवाडमध्ये धावत्या चिगरी बसला आग : चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले 30 प्रवाशांचे प्राण

Share

हुबळी ते धारवाड दरम्यान जलद बस सेवा देणाऱ्या बीआरटीएस चिगरी बसमध्ये एकामागून एक अपघात होत आहेत.आज चालत्या बीआरटीएस चिगरी बसला आग लागली.

एपीएमसी थांबा बीआरटीएस बस क्र. KA-25/F-3472 मध्ये आग लागली. बस धारवाडहून हुबळीकडे येत होती, धुराचे लोट दिसताच बस चालकाने प्रवाशांना तात्काळ उतरवून बस बाजूला घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.

चालकाच्या प्रसंगावधानामुळे चिगरी बसमध्ये प्रवास करणारे 30 हून अधिक प्रवासी बचावले. या बसेसमध्ये अनेकदा अपघात घडत आहेत.प्रवासी या बसमधून भीतीच्या तणावाखालीच प्रवास करत असून बसची योग्य देखभाल न केल्याने या अपघातांचे कारण असल्याचे बोलले जात आहे

Tags: