Dharwad

धारवाडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव

Share

पाच राज्यात कमळ फुलल्याचा आनंद व्यक्त करत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धारवाडमध्ये विजयोत्सव साजरा केला.

रविवारी सकाळपासूनच राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांतील निवडणुकांचे निकाल येण्यास सुरवात झाली. तिन्ही राज्यांतील मतदारांनी भाजपला साथ दिल्याच्या धारवाडमधील भाजपच्या छावणीत एकच जल्लोष करण्यात आला.

शहरातील सुभाष रोडवरील जिल्हा भाजप कार्यालयासमोर भाजप जिल्हास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाके फोडून व एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या मतदारांचे त्यांनी आभार मानले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून आनंद साजरा केला.

Tags: