घराचे कुलूप तोडून घरातील रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने लांबविणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात धारवाड येथील विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले आहे.
मुजावर महमूद रफिक सौदागर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या 20 जुलै रोजी राजीव गांधीनगर येथील घराची चावी तोडून घरातून सोने, चांदी व रोख रक्कम त्याने चोरून नेली होती. याप्रकरणी घरमालकाने विद्यागिरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करून चोरट्याला अटक केली. तपासात मिळालेल्या निश्चित माहितीवरून पोलिसांनी सध्या एका आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्याकडून 38 ग्रॅम सोने, 220 ग्रॅम चांदी आणि 5 हजार 300 रुपये रोख असा 2 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आता आरोपींची चौकशी पूर्ण झाली असून, अटक केलेल्या चोरट्याला न्यायालयासमोर हजर करून न्यायालयाच्या आदेशावरून तुरुंगात टाकण्यात आले आहे.


Recent Comments