शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयीन गेस्ट लेक्चरर्स असोसिएशनच्या वतीने धारवाड येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर अतिथी व्याख्यात्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी या मागणीसाठी आंदोलन केले.
राज्यातील 430 शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालये आज अतिथी व्याख्यात्यांच्या कर्तव्यावर अवलंबून आहेत. गेली दहा वर्षे सेवा देणाऱ्या या व्याख्यातांचं आयुष्य अनिश्चित आहे. सेवेच्या सुरक्षेसोबत पाहुणे बनवण्याची अनुचित प्रथा बंद केली पाहिजे. तसे न केल्यास वर्गावर कायमस्वरूपी बहिष्कार टाकून अनिश्चित काळासाठी संघर्ष करू, असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार विरोधी पक्षात असताना त्यांनी, गेस्ट लेक्चरर्सच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते की आमचे सरकार आले तर आम्ही तुमचा प्रश्न सोडवू. काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यानुसार अतिथी व्याख्यात्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हनुमंतगौडा कलमनी, डॉ. मंजुनाथ जंगवाड, डॉ. विनोद चंदा पीटर, प्रा. विजयालक्ष्मी जोशी, प्रा. दानेश्वरी, डॉ. वीरण्णा हलिकेरी, कृष्णा बेंटूर यांच्यासह शेकडो अतिथी व्याख्यात्यांनी भाग घेतला.


Recent Comments