नरेगा प्रकल्पाचा थकीत निधी द्यावा आणि दुष्काळ निवारणाची कामे सुरु करावीत या मागणीसाठी धारवाडमध्ये शेतकरी व शेतमजुरांनी आंदोलन केले.

शहरातील कलाभवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, अखिल भारतीय शेतकरी आणि शेतमजूर संघटनेच्या सदस्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध मोर्चा काढला. राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत आहे. ग्रामीण भागातील लोक रोजगाराविना त्रस्त आहेत. अशा वेळी राज्यातील मंत्री, आमदार पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. मात्र राज्य सरकारला आपल्या राज्यातील जनतेची काळजी नसल्याचे दिसून येत आहे.

दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतीची कामे दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे शेतमजुरांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने तातडीने दुष्काळ निवारणाचे काम राबवून नरेगा योजनेचा थकीत निधी त्वरित द्यावा. सरकारी रुग्णालयांच्या शुल्कवाढीचा निर्णय मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. या सर्व मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संघर्ष सुरू करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments