Vijayapura

विजापूरजवळ कार अपघातात तिघांचा मृत्यू

Share

राष्ट्रीय महामार्ग ५० वर विजापूर जिल्ह्यातील मनगुळीजवळ कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला असून आणखी एकाची प्रकृती गंभीर आहे.

सत्यवेणी (३८), हरीव्यंकटराम (२०) आणि जशवंत (१८) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर याच कुटुंबातील राघवेंद्र (४१) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे कुटुंब कारटगी येथून कारने (क्रमांक KA-33 N-4689) शिर्डी यात्रेसाठी निघाले होते.

प्राथमिक तपासानुसार, शिर्डी प्रवासाच्या तयारीसाठी हे कुटुंब रात्रभर जागे होते. त्यामुळे चालकाला झोपेची डुलकी आल्याने आणि कारचा वेग जास्त असल्याने हा अपघात घडल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी मनगुळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: