Belagavi

मंगाई देवी यात्रेनिमित्त पारंपरिक ‘वार’ पाळण्यास प्रारंभ

Share

बेळगावमधील वडगाव येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री मंगाई देवीच्या यात्रेनिमित्त ‘वार’ पाळण्याच्या मुख्य परंपरेला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी मंदिरात धार्मिक विधींसह हा ‘वार’ पाळण्याचा कार्यक्रम पार पडला.

बेळगावसह महाराष्ट्र आणि गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंगाई देवीच्या यात्रेनिमित्त आता महिनाभराचा पवित्र काळ सुरू झाला आहे. या काळात देवीला नारळ वाढवणे आणि ओटी भरणे निषिद्ध मानण्याची शेकडो वर्षींची जुनी परंपरा भाविक पाळतात. यात्रेपूर्वी नऊ मंगळवार आणि शुक्रवारी मंदिरात विशेष पूजा होणार आहे.

मुख्य यात्रोत्सव ११ ऑगस्ट रोजी साजरा होईल. यादिवशी सकाळी ११ ते १२ या वेळेत गाऱ्हाणे घालण्याचा धार्मिक विधी पार पडेल. या वेळी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यात्राकाळात भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर समिती, वडगाव ग्रामस्थ आणि स्वयंसेवक संयुक्तपणे तयारी करत आहेत.

Tags: