Dharwad

धारवाडमध्ये खंडणीसाठी एकाचे अपहरण; अपहरणकर्त्यांकडून तीन दिवस अत्याचार

Share

पैशासाठी एका व्यक्तीचे अपहरण करून तीन दिवस अत्याचार केल्याची घटना धारवाडमध्ये घडली आहे.

जय कर्नाटक संघटनेचे कार्याध्यक्ष तुकाराम मोहिते यांचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. त्याच्यावर सध्या धारवाड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. केआयएडीबी घोटाळ्यात तुरुंगात असलेल्या तुकाराम मोहिते यांचे काही लोकांनी अपहरण करून 36 लाख देण्यासाठी धमकी दिली. तसेच सतत तीन दिवस त्यांच्यावर अत्याचार केले.

तुकाराम मोहिते यांनीच त्यांचे अपहरण कोणी केले ते पोलिसांना सांगितले आहे.याप्रकरणी सध्या विद्यागिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.

Tags: