दिवाळीनिमित्त जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी छापा घटना धारवाड तालुक्यातील नरेंद्र गावात घडली. यावेळी जुगाऱ्यानी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धारवाड ग्रामीण स्थानकाच्या पोलिसांनी पीएसआय नागराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र गावात जुगार सुरू असल्याची खात्रीलायक माहितीवरून छापा टाकला. यावेळी जुगाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हल्ल्यानंतर 10 हून अधिक जुगाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.
या घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक गोपाल ब्याकोडे यांनी सांगितले कि , अधिकारी काल पहाटे एक वाजता उशिरा गस्तीवर होते. नरेंद्र शाळेजवळ जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकला त्यानंतर काही लोकांनी पीएसआय आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. याप्रकरणी धारवाड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरितांचा शोध सुरू आहे. दहा संशयित आहेत. कॉन्स्टेबल नागराजच्या डोक्याला मार लागला. पीएसआय बसनागौडा यांच्या हाताला आणि मानेला दुखापत झाली आहे. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 3-4 दिवसात जुगाराचे एकूण 27 गुन्हे दाखल झाले. 236 जणांना अटक करण्यात आली आहे. ३.३८ लाख रु. ही रक्कम जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments