Dharwad

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याची जय कर्नाटक संघटनेची मागणी

Share

परीक्षांमध्ये बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जय कर्नाटक संघटनेचे मानद जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दोड्डमनी यांनी केली.

धारवाड येथे आज पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण दोड्डमनी म्हणाले की, परीक्षेतील गैरप्रकारांमुळे जिद्दीने अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. सरकारने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या सर्वांना शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या, संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन पीएसआय परीक्षा व केईटी परीक्षेतील गैरव्यवहारांबाबत योग्य ती पावले उचलून हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली. बाईट
पत्रकार परिषदेला जय कर्नाटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर मुधोळ, परशुराम दोड्डमनी आदी उपस्थित होते.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavi #exammalpractice #jaykarnataka #karnataka #education #corruption #injustice