Dharwad

आशा वर्कर्सच्या समस्या सोडविण्यासाठी धारवाडमध्ये आंदोलन

Share

कर्नाटक राज्य युनायटेड आशा वर्कर्स असोसिएशनच्या सदस्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज धारवाड जिल्हा पंचायत कार्यालयासमोर निदर्शने केली.

आशा कार्यकर्त्यांनी कडपा मैदान ते जिल्हा पंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शासनाने तत्काळ मानधनात वाढ करावी, इतर विभागांचे लावलेले काम बंद करावे, मोबाईलवर आधारित कामावर दबाव टाकण्यासह विविध समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली. .

या संदर्भात जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, आशा कार्यकर्त्यांनी सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी अन्यथा आगामी काळात अधिक आक्रमकपणे आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला.

Tags:

#Protest #Demand #Resolution #Problems #Karnataka