भरधाव कारने धडक दिल्याने एक रिक्षा आणि 4 दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवानेच या घटनेत जीवितहानी झाली नाही.
बेळगावातील गणपत गल्लीत आज शनिवारी सकाळी भरधाव कारने रस्त्यात उभ्या असलेला एका रिक्षाला तसेच 4 दुचाकींना धडक दिली. त्यामुळे या वाहनाचे नुकसान झाले.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
सुदैवाने सकाळची वेळ असल्याने आणि रिक्षात कोणी नसल्याने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच खडेबाजार व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली


Recent Comments