विद्याकाशी, सुसंस्कृत लोकांचे शहर म्हणवल्या जाणाऱ्या धारवाडमध्ये माणुसकीच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.
धारवाडच्या जकनीबावी सर्कलमध्ये दहा तरुणांच्या जमावाने एका तरुणाला मारहाण केल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. तो तरुण खाली पडला तरीही जमावाकडून त्या तरुणांला मारहाण करण्यात आली.
तेथे उपस्थित असलेल्या जनतेने हे दृश्य पाहिले आणि त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केले. पण कोणीही त्या युवकाला सोडवायला गेले नाही. ही घटना शहर पोलीस स्टेशन पासून काही अंतरावरच घडली. या घटनेमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.


Recent Comments