धारवाड तालुक्यातील बेलूर औद्योगिक परिसरातील स्वराज ट्रॅक्टर शोरूममधून ट्रॅक्टरची बॅटरी चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात गरग पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले आहे.
वीरपूर येथील हुवाप्पा जेरीगवाड, हेगेरी येथील रसुलसाब शेखसनदी आणि नसीर हुसेन दावलण्णा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आणखी एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरु आहे.
नुकतेच स्वराज ट्रॅक्टर शोरूममधून बॅटऱ्या चोरीला गेल्याची तक्रार गरग पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गोपाल ब्याकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समीर मुल्ला, पीएसआय डी. प्रकाश, मंटूर व कर्मचारी बसवराज धुपदाळ यांनी कारवाई करून तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 15 बॅटऱ्या जप्त केल्या.


Recent Comments