झाडावरील तोंडली काढण्यास गेलेल्या मुलाला , झाडाशेजारील विजेच्या खांबावरील तारेचा स्पर्श होऊन , त्याचा मृत्यू झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील खैनूर गावात घडली,

शांताप्पा गडगीमणी (१०) हा मुलगा गुरांना चारण्यासाठी घेऊन गेला होता . त्यावेळी त्याला झाडावर चढलेल्या वेलाला तोंडली लागल्याचे दिसून आले . तो ती काढण्यासाठी झाडावर चढला मात्र झाडाशेजारील विजेच्या खांबावरील वीजभारीत तारेचा त्याला स्पर्श होऊन शॉक बसल्याने , तो झाडावरून खाली पडला आणि शांताप्पा याचा मृत्यू झाला.

सिंदगी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments