19 वर्षे भारत मातेची सेवा केल्याबद्दल धन्यवाद.. वडिलांना गणवेशात पाहण्यासाठी धावणारी मुले.. भावाला पाहून आनंदाचा वर्षाव करताना मोठा भाऊ..भारत माता की जयच्या घोषणा.
होय! भारतीय सैन्यात 19 वर्षे प्रदीर्घ काळ भारत मातेची सेवा करून आपल्या गावी परतलेल्या ईश्वर अयट्टी या सैनिकाचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. गावातील सर्व ज्येष्ठांनी गावातील रेणुका यल्लम्मा मंदिरापासून मिरवणूक काढून ईश्वर अयट्टी यांचे जल्लोषात स्वागत केले.
ईश्वर अयट्टी यांनी गावातील रेणुका यल्लम्माच्या मंदिरात जाऊन देवीची पूजा केली. तेथून मोठ्या मिरवणुकीने ईश्वर अयट्टी याना गावातील मल्लिकार्जुन मंदिरात आणण्यात आले . मिरवणुकीत तरुणांनीफटाके फोडले आणि फुलांचा वर्षाव केला. यावेळी बोलताना ईश्वर अयट्टी म्हणाले कि, 19 वर्षे भारत मातेची सेवा करण्याची संधी मिळाली . आपल्या कारकिर्दीतील दिवस आपण कधीही विसरणार नाही, असे सांगून त्यांनी कर्तव्यादरम्यानच्या दिवसांची आठवण करून दिली.
ईश्वर अयट्टी यांनी पठाणकोट, जम्मू-काश्मीर, आसाम, भोपाळसह अनेक ठिकाणी सेवा बजावली आहे. एका सैनिकाची पत्नी असल्याचा मला खूप अभिमान आहे. निवृत्त जवान ईश्वर यांची पत्नी अन्नपूर्णा हिने आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या .
भारत मातेची सेवा करणाऱ्या आणि निवृत्त होऊन सुखरूप घरी आलेल्या सैनिक ईश्वर अयट्टी यांचाही भव्य सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विरक्तमठचे कुमार विरुपाक्ष स्वामीजी आणि गावातील ज्येष्ठ मंडळीं या कार्यक्रमात सहभागी झाले होते . शाळकरी मुलांनी या मिरवणुकीत सहभागी होऊन या जवानांचे स्वागत केले हे विशेष.


Recent Comments