काँग्रेस सरकारने कावेरी खोऱ्यात पाणी सोडले असते तर तामिळनाडूला पाणी सोडण्याची गरजच पडली नसती असे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हटले आहे.
कावेरी पाणीप्रश्नी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत भाग घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री बोम्मई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तमिळनाडूला 10 हजार क्युसेक्स पाणी सोडणे राज्यासाठी धोकादायक आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याबाबत पुरेसा युक्तिवाद करावा.
आपल्या शेतकऱ्यांना पाणी न सोडता इतरांना पाणी सोडणे योग्य नाही. राज्याची जमीन आणि पाण्याबाबत आपण सर्वांनी अशीच भूमिका घेतली आहे असे बोम्मई म्हणाले.


Recent Comments