Belagavi

वडगावच्या श्री मंगाई देवी यात्रेनिमित्त विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Share

वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर धार्मिक विधी पार पडले. शतकांची परंपरा जपत शेकडो कुमारिकांनी देवीला जलाभिषेक करून विशेष पूजा अर्चा केली.

या धार्मिक विधीदरम्यान श्री मंगाई देवस्थान समिती आणि स्थानिक युवक मंडळांच्या संयुक्त विद्यमाने पूजेत सहभागी झालेल्या सुमारे १ हजार ते १२ शे बालिकांना वह्या, पेन आणि पेन्सिल यांसारख्या शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

संस्कृतीच्या जपणुकीसोबतच मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

येत्या मंगळवारी सकाळी ११ ते १२ च्या मुहूर्तावर पारंपरिक गार्हाणे घालून यात्रेच्या मुख्य सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. विविध राज्यांतून लाखो भाविक येण्याची शक्यता असल्याने शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेकडून आवश्यक तयारी करण्यात आली असून संपूर्ण वडगाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात आहे.

Tags: