Belagavi

कडोलीत सदगुरु श्री बाळूमामांच्या नूतन मंदिरात पूजा

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील आमराईत असलेल्या सदगुरु श्री बाळूमामांच्या नूतन मंदिरात श्रावण मासानिमित्त विधिवत पूजा आणि महारासाद पार पडला .

आमराईतील शिवाजी मैदानावरील सद्गुरू श्री बाळूमामा मंदिरात श्रावणाच्या पहिल्या रविवार निमित्त विशेष पूजा करण्यात आली . या निमित्ताने गावात वादयघोषात आंबील कलश मिरवणूक काढण्यात आली .

 

यावेळी बोलताना भाविकांनी सांगितले कि , गेल्या पंधरा वर्षांपूर्वी , बेळगाव परिसरातील गावोगावी बाळू मामांची बकरी वस्तीला येत होती . तशीच कडोली गावात देखील ही बकरी वस्तीला होती . त्यावेळी एका बकरीला पिल्लू झाले आणि ते मृत झाले . त्याला तिथेच पुरून त्या जागेवर मंदिर बांधण्यात आले .

धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी छोटेसे पत्र्याचे मंदिर उभारून , नागपंचमी आणि श्रावण महिन्याचा पहिला रविवार असे औचित्य साधून मंदिरात विशेष पूजा करून जत्रा महोत्सव साजरा करण्यात आला . यानिमित्ताने महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले


या पूजा महोत्सवासाठी कडोली गावातील गावकरी , महिला आणि मुले मोठया संख्यने सहभागी झाली होती .

Tags: