हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात उबाठा शिवसेनेच्या सीमाभाग विभागाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
बेळगावातील मंगाईनगर येथील सोमेश्वरी सभागृहात उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि मंगाईनगरच्या पंचांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना बंडू केरवाडकर यांनी बाळासाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सीमाप्रश्नासाठी बाळासाहेबांनी उभारलेला लढा आजही विसरता येणार नाही. त्यांच्या संघर्षामुळेच सीमाप्रश्न आजही जिवंत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपनगरप्रमुख प्रवीण तेजम, शाहापूरप्रमुख अमर कडगावकर, मंगेश नागोजीचे, सहदेव रेमाणाचे, सागर पाटील, श्रीधर बिरजे, बाळू भोसले, मंगेश पोते, किशोर तळेकर, मंजू कडोलकर, महेश हसबें, रमेश कडोलकर, संतोष कडोलकर आणि गजानन अनवेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.


Recent Comments