धारवाड जवळ गॅस टँकर पलटी झाल्याने , बेळगावकडून धारवाडकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती .
मात्र आता हायवे रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे .
बुधवारी संध्याकाळी गॅसचा टँकर , धरवडजवळ पलटी झाला होता .
त्यांनतर , धारवाड उच्च न्यायालयाजवळील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता .
त्यामुळे , कित्तूर-तडकोड-गरग –धारवाड शहराच्या हद्दीतून तसेच हिरेबागेवाडी -बैलहोंगल -बेळवडी – तडकोड- ग्रॅड- धारवाड त्याचप्रमाणे , संकेश्वर -हुक्केरी- घटप्रभा – गोकाक-यरगट्टी -सौंदत्ती-धारवाड अशी वाहतूक वळवण्यात आली होती .
आता ही वाहतूक कित्तूरमार्गे गजराज पॅलेस , कुलवळ्ळी, अळणावर रोडमार्गे धारवाड अशी वाहतूक सुरु करण्यात आली आहे .


Recent Comments