Banglore

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे गुंड एकत्र येत असल्याची केली टीका

Share

काश्मीर-कन्याकुमारीतील गुंड एकत्र येत आहेत: यत्नाळ यांनी विरोधकांच्या बैठकीवर आगपाखड केली आहे .

कर्नाटकचे ज्येष्ठ भाजप नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी बंगळुरू येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या बैठकीवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी बोलताना यत्नल म्हणाले की, काश्मीर-कन्याकुमारी येथील गुंड एकत्र येत आहेत. लोकसभा निवडणुकीत

मोदींचा पराभव करण्यासाठी ते एकत्र येत आहेत. राज्यातील जामिनावर असलेली

सर्व कुटुंबे एकत्र आहेत. पुन्हा नरेंद्र मोदी निवडून आल्यास त्यांना तुरुंगात जाण्याची भीती आहे . त्यामुळे सर्व दरोडेखोर एकत्र येत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केली.

Tags: