ओल्ड पी बी रोड येथील श्री रेणुका देवी मंदिराला खास गुरू पौर्णिमेच्या औचित्याने भाजप नेते किरण जाधव यांनी आर्थिक मदत दिली आहे.
श्री रेणुका देवी मंदिराचे जीर्णोद्धाराचे अंतिम टप्प्यात आहे यासाठी अनेक भाविक सढळ हस्ते मदत करत आहेत किरण जाधव यांनीही आर्थिक मदत देऊ केली आहे.यावेळी किरण जाधव यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या जागृत देवस्थानच्या
सुरू असलेल्या जीर्णोद्धार कामाची पाहणी करून समाधान व्यक्त करत मंदिराचे बांधकाम सुरेख आणि कोकण पद्धतीने झाल्याचे समाधान व्यक्त केले यावेळी खास गुरू पौर्णिमे निमित्त किरण जाधव यांनी पूजन केले. मंदिराचे अध्यक्ष राहून मुचंडी यांच्याकडे धनादेश सोपविला याप्रसंगी वसंत हलगेकर,
चंद्रकांत कामुले,विनोद पुजारी,यल्लाप्पा पाटील बाळू लोहार आदी उपस्थित होते.


Recent Comments