कर्नाटकात भारतीय जनता पक्ष शेवटच्या घटका मोजत आहे, त्याची अनेक शकले उडाली आहेत अशी जहरी टीका करतानाच भाजप सरकारच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी करून दोषींना गजाआड केल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा बृहत व माध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी दिला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बृहत व माध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली. जनतेने भाजपला धडा शिकवलंय, शिक्षा दिलीय. सत्ताकाळात त्यांनी एकही गरिबांसाठी घर बांधले नाही. ते उरलेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचे?, भाजप राज्यात अंतिम घटक मोजतोय, त्याची अनेक शकले उडाली आहेत. भाजप 100 दरवाजांचे घर बनलाय. 40 टक्के कमिशन खाण्याव्यतिरिक्त त्यांनी काहीच केलेले नाही. त्यांच्या काळातील घोटाळ्यांची सखोल चौकशी करून दोषींना गजाआड केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
भाजप असा फुटलाय की तो फेविकॉलने जोडता येणार नाही. त्यात एक-दोन नव्हे तर वीस गट झालेत. त्यांच्या नेत्यांमधील भांडणे, अंतर्गत वाद जगजाहीर झालेत. पराभवाचे खापर एकमेकांवर फोडतात, कधी येडियुरप्पा, कधी निराणी, कधी के एस पाटील नडहळ्ळी, कधी यत्नाळ तर कधी अडीज कोटी जबाबदार असल्याचे सांगतात. बोम्मई यांनी आधी आपलं घर बघावं, मग दुसऱ्यावर टीका करावी असा सल्ला त्यांनी दिला.


Recent Comments