बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आज समर्थ नगर येथे २४ तास पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले. यामुळे स्थानिक रहिवाशांना अखंडित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

योजनेचे स्वागत करत रहिवाशांनी आमदारांचे आभार मानले. तसेच भुयारी गटाराचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली.

यावर बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी, भुयारी गटाराचे काम पूर्ण होताच या वर्षाच्या अखेरपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले.
क्षेत्रातील रस्ते, पाणी आणि सांडपाणी व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदारांनी सांगितले.


Recent Comments