बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथील एका व्यक्तीची डोक्यात दगड किंवा अवजार घालून निर्घृण हत्या केल्याची घटना अनगोळ तलावाशेजारील शेतवाडीमध्ये आज गुरुवारी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
संजय तुकाराम पाटील, वय 34, रा. जिजामाता गल्ली, येळळूर या व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आज सकाळी वडगाव येथील शिवारात आढळून आल्याने खळबळ उडाली. त्याच्या डोक्यात दगड किंवा अवजड वस्तूने प्रहार करून खून केल्याचे दिसून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संजयला दारूचे व्यसन होते. तो काल दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडला होता. मात्र रात्रीपर्यंत घरी परतलाच नाही. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह खून झालेल्या अवस्थेत अनगोळ तलावाशेजारील शेतात आढळून आला. मृतदेह ज्या स्थितीत आढळला त्यावरून अज्ञात मारेकऱ्यांनी संजयच्या डोक्यात फावडा वगैरे सारख्या एखाद्या अवजाराने किंवा दगड घालून त्याची हत्या केली असल्याचा कयास आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आहे.


Recent Comments