बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी बेळगावातील अंजनेयनगर येथील शासकीय शाळेला भेट देऊन शाळेची अवस्था, कमतरता आणि मुलांच्या शिक्षणाची पाहणी केली.
आमदार आसिफ उर्फ राजु सेठ यांनी अंजनेय नगर येथील शासकीय शाळेला भेट देऊन शाळेत मुलभूत सुविधा नसल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.
शासकीय शाळेच्या भेटीदरम्यान त्यांनी पहिली ते सातवीच्या वर्गात केवळ ३३ विद्यार्थी असल्याचे पाहून चिंता व्यक्त केली. तसेच, ध्वजस्तंभ आणि जुन्या वातानुकूलित इमारतींचे आणि स्मार्ट बोर्ड रूमच्या झालेल्या नुकसानीची पाहणी आमदारांनी केली. बरेच दिवस शाळा बंद राहिल्याने डेस्क आणि टेबल धुळीने भरलेले होते.

शासकीय शाळेत मुलभूत सुविधांचा अभाव व योग्य शिक्षण व्यवस्थेचा अभाव याबाबत शिक्षकाना विचारणा केली. त्यानंतर त्यांनी गटशिक्षणाधिकारी रवि भजंत्री यांच्याशी चर्चा करून शाळेला आवश्यक पायाभूत सुविधा व विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जी काही मदत हवी ती लवकरात लवकर करण्यात येईल असे सांगितले.
मूलभूत सुविधांपासून वंचित आणि योग्य शिक्षण पद्धतीचा अभाव ही मुले भविष्यात चांगले नागरिक बनून देशाचे प्रतिष्ठित नागरिक कसे होतील, याबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.
आमदाराच्या भेटीवेळी माजी नगरसेविका पुष्पा संतोष पर्वतराव व शाळेचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments