बेळगाव तालुक्यातील तुरमुरी येथील महापालिकेच्या कचरा डेपोला आज सकाळी बेळगावच्या महापौर शोभा सोमानाचे व उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील यांनी नगरसेवक व अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली.
बेळगावच्या महापौर शोभा सोमानाचे व उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील यांनी आज तुरमुरी येथील महापालिकेच्या कचरा डेपोला भेट देऊन प्रकल्पाच्या कामकाजाची तांत्रिक माहिती घेतली. यावेळी महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी कलादगे व कचरा डेपो प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी महापूर व उपमहापौरांना डेपोत दररोज होणारी कचऱ्याची आवक, त्यावर कोणकोणत्या टप्प्यात प्रक्रिया केली जाते याबाबत तपशीलवार माहिती दिली.

सर्व माहिती घेऊन महापौर शोभा सोमानाचे व उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील यांनी अधिकाऱ्यांना दक्षता घेऊन काम करण्याची सूचना केली. यावेळी सत्ताधारी गटनेते राजशेखर डोनी, नगरसेवक श्रेयस नाकाडी, हेल्थ डिपार्टमेंटचे अधिकारी कलादगे व इतर अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments