बेळगावातील एअरमेन ट्रेनिंग स्कूल येथे अग्निवीरवायूच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांचा दीक्षांत समारंभ 3 जून 2023 रोजी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम एअरमेन ट्रेनिंग स्कूलमध्ये 2675 अग्निवीरवायूंच्या 22 आठवड्यांच्या अब-इनिशियो प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप आहे.
या समारंभाला एअर मार्शल आर राधीश, एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ, ट्रेनिंग कमांड, इंडियन एअर फोर्स हे प्रमुख पाहुणे असतील. इतर विविध पाहुणे, मान्यवर आणि प्रशिक्षणार्थींच्या पालकांनाही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
अग्निपथ योजनेंतर्गत पहिले अग्निवीरवायू प्रशिक्षण 30 डिसेंबर 2022 रोजी एअरमेन ट्रेनिंग स्कूल, बेळगाव येथे सुरू झाले. स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी

भारतीय हवाई दलाने महिला उमेदवारांसाठीही आपले दरवाजे उघडले आहेत. त्यांचे प्रशिक्षण 28 जून 2023 पासून एअरमेन ट्रेनिंग स्कूल बेळगाव येथे पुरुष समकक्षांसोबत सुरू होईल.


Recent Comments