Belagavi

कोटबागीजवळ कार-दुचाकी अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू

Share

हुक्केरी तालुक्यातील कोटबागीजवळ कारला भरधाव दुचाकीने मागून धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाला.

हुक्केरी-घटप्रभा राज्यमहामार्गावर कोटबागीजवळ संथगतीने जाणाऱ्या इंडिका कारला मागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीचालक शिवानंद भुसगोळ जागीच ठार झाला.


हुक्केरीचे पोलीस निरीक्षक रफिक तहसीलदार व कर्मचारी मंजुनाथ कबुरी यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला.

Tags: