वाहने चालविताना आपला व इतरांच्या जीवाची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वानी दुचाकी चालविताना सक्तीने हेल्मेट वापरावे असे आवाहन बीएससी द टेक्स्टाईल मॉलचे संचालक बी. एस. चंद्रशेखर यांनी केले.
बेळगावातील गोवावेस येथील बीएससी द टेक्स्टाईल मॉलतर्फे कर्मचाऱ्यांना वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन करून त्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना मॉलचे संचालक बी. एस. चंद्रशेखर म्हणाले की, प्रत्येकाने वाहने चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी हेल्मेटचा वापर केला पाहिजे.
त्यानंतर बोलताना मॉलचे संचालक बी. एस. मृणाल म्हणाले की, बीएससीच्या दावणगेरे येथील मॉलमधील एका कर्मचाऱ्याला अपघातात जीव गमवावा लागल्याची घटना घडली. पोलीस तपासात त्याने वाहन चालविताना हेल्मेट घातले नसल्याने त्याचा जीव गेल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांत हेल्मेट वापराविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. वाहन चालविताना प्राणी, माणूस किंवा अन्य वाहन आडवे आले तर हमखास अपघात होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात तर पाणी आणि चिखलामुळे वाहने घसरून पडण्याच्या घटना घडतात. अशावेळी हेल्मेट नसेल तर जीवाचे बरेवाईट होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांनीच वाहने चालविताना हेल्मेट घालावे असे आवाहन त्यांनी केले. बाईट
यावेळी स्टोअर मॅनेजर अमजद जमादार, मार्केटिंग मॅनेजर इरण्णा शिवशेट्टी यांच्यासह बीएससी ए टेक्स्टाईल मॉलचे संचालक, कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments