Dharwad

सर्व काही बदलून टाकू हा काँग्रेसचा अहंकार, हे रिव्हर्स गिअरचे सरकार : बोम्मई

Share

काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करते हे सर्वश्रुत आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे, काय करतात ते पाहूया. पण सर्वसामान्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही लढू असा इशारा माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला.


हुबळी येथील आपल्या निवासस्थानी बोलताना बोम्मई यांनी राज्यातील जनतेवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले. आम्ही कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाठ्यपुस्तक बदलाच्या मुद्द्यावर उत्तर देताना, काँग्रेसवाले नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण करतात. जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या आम्ही लढा देऊ. सत्ता आल्यावर सर्व काही बदलून टाकू, असे म्हणणे अहंकार आहे. हे रिव्हर्स गियर सरकार आहे. ते त्यांची हमीही उलटवतील. आम्ही बनवलेल्या लोकप्रिय कायद्याच्या उलट जात आहेत. लोकांना त्याचा परिणाम लगेच कळेल. हे सरकार केवळ रिव्हर्स गियर सरकार नसून इतक्या लवकर सुडाचे राजकारण करत आहे अशी टीका त्यांनी केली. बाइट
एकंदर काँग्रेसचे सरकार रिव्हर्स गियर सरकार असून सुडाचे राजकारण करत आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.

Tags: