हजरत निजामुद्दीनवरून बेळगावमार्गे हुबळीकडे येणाऱ्या कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना मुदत संपलेले (एक्स्पायर्ड) अन्नाचे पाकीट दिल्याची घटना समोर आली आहे.

गाडी क्रमांक १२६३० या रेल्वेतील डिलिव्हरी बॉयने दिलेले अन्नाचे पाकीट तपासले असता त्यावर छापलेली एक्स्पायरी डेट उलटून गेल्याचे प्रवाशाच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशाने तात्काळ रेल्वे प्रशासनाकडे अधिकृत तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच डिलिव्हरी बॉय आणि मॅनेजरने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.



Recent Comments