सार्वजनिक बांधकाम खात्याने बेळगावातील श्रीनगर गार्डन ब्रिज सर्व्हिस रोडची अद्याप दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी या खात्याच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
2 महिने उलटूनही श्रीनगर गार्डन ब्रिज सर्व्हिस रोडची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्याशिवाय येथील जलवाहिनीची गळती रोखण्यातही या खात्याला अपयश आले आहे. श्रीनगर पुलाजवळील हा रस्ता अनेक दिवसांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. येथील पाण्याची पाईप फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावरून अनेक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी प्रवास करूनही रस्ता व पाइपलाइन दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही याचा नागरिकांनी खेड व्यक्त केला आहे.


Recent Comments