Belagavi

अखेर सदाशिवनगरात मनपाकडून नालासफाई सुरु

Share

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या प्रयत्नांमुळे अखेर महानगरपालिका जागी झाली असून, सदाशिवनगरातील नाला सफाई मोहीम मनपाने सुरू केली आहे.


सदाशिव नगर शेवटचा क्रॉस येथे नाला तुंबून भरलेल्या होता. नाल्यामध्ये कचरा अडकून सांडपाणी पुढे जात नव्हते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांचे निवेदन कामी आले आहे. मनपाने जेसीबीकरवी आज सकाळी 8 वाजता नाला सफाई मोहीम सुरू केली. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी स्वतः थांबून नाला सफाई करवून घेतली आहे. सदाशिव नगर, नेहरू नगर, आझम नगर भागातून गटारिंचे सांडपाणी या नाल्याला जोडले आहे. परंतु नाल्यात कचरा अडकल्याने त्याचा निचरा नीट होत नव्हता. आता मनपाने नाल्याची सफाई सुरु केल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले असून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांचे आभार मानले आहेत.

Tags: