Belagavi

श्री वैद्यनाथ देवाला दवणा चढवण्यासाठी बेळगावातून भाविक रवाना

Share

 

सालाबाद प्रमाणे श्री ज्योतिर्लिंग देवस्थान दादा अष्टेकर भक्त मंडळ नार्वेकर गल्ली बेळगाव येथून भाविक आज रविवारी दुपारी 5 वाजता महिपाळगड वैद्यनाथ येथे बैलगाड्यांसोबत पायी रवाना झाले आहेत.

वैद्यनाथ डोंगरावर पोहोचल्यानंतर तिथे आज वस्ती राहून उद्या रविवार दि. 21 मे रोजी सकाळी पहाटे 5 वाजता वैद्यनाथ देवाला दुग्धाभिषेक करून देवाला दवणा आणि गुलाल चढवून खीर भात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप करून परत संध्याकाळी परतीचा प्रवास करणार आहेत. चैत्र यात्रा झाल्यावर श्री वैद्यनाथ देवाला दवणा चढवण्याची जुनी प्रथा श्री ज्योतिर्लिंग देवस्थान दादा अष्टेकर भक्त मंडळ नार्वेकर गल्लीचे भक्तगण आजतागायत जोपासत आहेत.

Tags: