Belagavi

राजहंसगड स्थळ देवाची यात्रा भक्तिभावाने साजरी

Share

बेळगाव तालुक्यातील येळ्ळूरजवळील राजहंसगडावर स्थळ देवाची दोन दिवसीय यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिभावाने पार पडली.


सात वर्षातून एकदा ही यात्रा भरवली जाते. श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटी व राजहंसगड गाव पंच कमिटी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा भरवली जाते. ही यात्रा भरवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अनेक वर्षापासून वाडवडिलांपासून स्थळ देवाची यात्रा साजरी केली जाते. गावातील सर्वच जनसमुदाय आरोग्यपूर्ण आणि गुण्यागोविंदाने नांदावे व सर्व परिवार यात्रेच्या निमित्ताने एकत्र यावे हाच एक उद्देश ठेवून ही यात्रा सात वर्षातून एकदा राजहंसगड गावच्या सीमेलगत भरवली जाते. आसपासच्या गावातील अनेक भाविक या यात्रेला येतात आणि महाप्रसादाने ते धन्य होतात.

या संदर्भात अधिक माहिती देताना गावातील नागरिकांनी सांगितले की, दोन दिवसाच्या या कार्यक्रमांमध्ये पहिल्या दिवशी गावातील संपूर्ण नागरिकांना व आसपासच्या भाविकांना बोलावून एकत्र महाप्रसाद केला जातो. यानंतर दुसरे दिवशी पै पाहुण्यांना बोलावून घरीच जेवण दिले जाते. या दोन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये रात्री नाटक, आर्केस्ट्रा असे सांस्कृतिक कार्यक्रम ही पार पडले आहेत गाव कमिटी ग्रामपंचायत सह इतर युवा वर्गणी या कार्यक्रमाला हातभार लावून ही यात्रा यशस्वी केली आहे.
दरम्यान स्थळ देव यात्रेला राजहंसगड, येळ्ळूर, देसूर, नंदिहळ्ळी आदी गावातील भाविकांनी हजेरी लावली. राजहंसगड सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा पार पडली.

Tags: