Belagavi

बेळगावात गॅरेजसमोर ठेवलेल्या तीन मोटारींना आग

Share

बेळगावातील टिळकवाडीतील हेरवाडकर स्कूलसमोरील गॅरेजसमोर ठेवलेल्या तीन मोटारींना आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

टिळकवाडीतील हेरवाडकर स्कूलसमोरील गॅरेजसमोर दुरुस्तीसाठी तीन कार्स ठेवण्यात आल्या होत्या. भरदुपारी कोणीतरी गॅरेजजवळील कचऱ्याच्या ढिगाला आग लावली. बघताबघता ही आग इतरत्र पसरून गॅरेजपर्यंत गेली. त्यामुळे गॅरेजमधील तिन्ही कार्स आगीत भस्मसात झाल्या.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. पण तोपर्यंत तिन्ही कार जळून खाक झाल्या होत्या. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags: