विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील नाडाकेडी क्रॉस ते शिरश्याड गावापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण ते केलेल्या काही वेळातच उखडल्याने नागरिकांनी ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरल्याची घटना नाडाकेडी केईबीजवळ घडली.

हे काम 2023 मध्ये मंजूर झाले आहे. सध्या ठेकेदाराने काम सुरू केले आहे, शिरश्याड येथील ग्रामस्थांनी अचानक कामाची पाहणी केली असता ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले. ठेकेदाराने ग्रामस्थांना योग्य प्रतिसाद न दिल्याने ग्रामस्थांनी संबंधित सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना फोन केला. यावेळी नागरिकांनी, जोपर्यंत दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण जागा सोडणार नाही असा पवित्रा घेत वाद घातला. त्यामुळे काही तास वाहतूक कोंडी होऊन जनतेला त्रास झाला. यावेळी चंद्रकांत पासोडी, राघवेंद्र बिल्लाड, पुंडलिक तडलिगी, राघवेंद्र तडलिगी, विनोद बिरादार, दादू कोनसीरसागी, उमेश मुळूजी, राघवेंद्र देवरमनी आदी उपस्थित होते.


Recent Comments