राजू पवार डान्स अकॅडमी बेळगावचे राजू पांडुरंग पवार यांना युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या कला गुणांचा गौरव करणाऱ्या संस्थेकडून महाराष्ट्र प्राइड ऑफ स्टार अवॉर्ड 2023 हा मानाचा बहुमान सध्या स्टार प्रवाह या टी. व्ही. मालिका स्वाभिमान मध्ये नायकाची भूमिका वटविणारे प्रसिद्ध मराठी कलाकार माननीय मिलिंद दास्ताने यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 14 में 2023 रोजी डॉक्टर काशिनाथ घाणेकर हॉल ठाणे (पश्चिम) या ठिकाणी प्रदान करण्यात आला.
सदरी कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक व चीफ एडिटर माननीय प्रोफेसर डॉक्टर बी एन खरात आणि राष्ट्रीय जुरी मेंबर माननीय ए आर आखाडे यांनी केले होते.
सदरी कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्रपट निर्माते माननीय डॉक्टर दीपक चौधरी, प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर स्वप्निल लेले निर्देशक हेल्थ सर्विसेस व्हर्मेट ऑफ महाराष्ट्र तसेच सदरी कार्यक्रमास माननीय संस्कृती गोडसे (UTBR) पुणे माननीय शिवांगी आखाडे रत्नागिरी माननीय प्रतिभा शिर्के ठाणे अशा
गणनीय व्यक्ती उपस्थित होत्या.
बेळगाव सारख्या शहरात राहून नृत्य कलेचा अविष्कार आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात अग्रगण्य असलेल्या आणि या कार्यक्रमादवारें अनेक सिने कलावंतांना बेळगाव मध्ये बोलवून कलागुणांचा आस्वाद बेळगावच्या रसिक प्रेक्षकांना देण्याचे बहुमोल असे कार्य राजू पवार डान्स अकॅडमी चे श्री राजू पवार हे गेली तीस वर्षे नृत्य क्षेत्रात अग्रगण्य आहेत. आपल्या कलागुणांबरोबरच सामाजिक
बांधिलकीचे संगोपन करण्यास हिरीरीने पुढाकार घेत असलेल्या श्री राजू पवार यांना हा बहुमान मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. बेळगाव परिसरातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Recent Comments