Dharwad

आमदार प्रसाद अब्बय्या यांना मंत्रीपद द्या : गणेश टगरगुंटी

Share

राज्य विधानसभा निवडणुकीत हुबळी-धारवाड पूर्व मतदारसंघातून तिसऱ्यांदा जिंकून हॅट्ट्रिक साधणारे आमदार प्रसाद अब्बय्या यांना नवीन मंत्रिमंडळात मंत्रीपद द्यावे अशी मागणी हुबळी-धारवाड महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते गणेश टगरगुंटी यांनी केली.
नगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हु-धा पूर्व मतदारसंघाच्या विकासात अनेक योगदान दिले आहे.

मतदारसंघातील मागासवर्गीयांसाठी तीन हजार घरे बांधण्यासह झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी आमदार प्रसाद अब्बय्या यांनी परिश्रम घेतले आहेत. या मतदारसंघात अजूनही विकासकामे सुरू असून त्यांच्या सेवेचा कार्यक्षेत्र राज्यभरात विस्तारणे आवश्यक आहे, त्यामुळे त्यांना नव्या मंत्रिमंडळात मंत्रिपद दिल्यास त्यांच्याकडून अधिक विकास होऊ शकेल, असे ते म्हणाले.
अब्बय्या यांना मंत्रिपद न दिल्यास संघर्ष केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत नागेश कत्रीमल, श्रीनिवास बेळवडी, वसंत अनंतपूर, नागार्जुन कत्रीमल उपस्थित होते.

Tags: