केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 मच्छे बेळगाव येथील सी. बी. एस ई च्या 10 वी व 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला आहे.
मच्छे येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 चा सी. बी. एस. ई निकाल जाहीर करण्यात आला आहे.
10 वी विभागात कुमारी झुहाफातिमा एस. अत्तार हिने 92.2 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
तर 12 वी विज्ञान शाखेत कुमार संस्कार वाय. बागेवाडी यांने 91.6 टक्के गुण मिळवून केंद्रीय विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. केंद्रिय विद्यालयातून परिक्षा दिलेल्या 10 वी व 12 वीचे सर्वच्या सर्व विद्यार्थी पास होऊन केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 चा
निकाल 100% लागला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य शशी ई. के. व सर्व शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन लाभले आहे.


Recent Comments