Belagavi

एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूमध्ये दोन दिवसीय कार्यशाळा

Share

बेळगाव येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट येथे 15 आणि 16 मे 2023 रोजी साखर कारखान्यातील उसाचा रस शुद्धीकरण आणि बाष्पीभवनाची मूलभूत संकल्पना आणि आधुनिक बदल याविषयी साखर उत्पादन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आर.बी.खंडगावे, संचालक, एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट, यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सांगितले की, साखरेचा दर्जा सुधारण्यासाठी उसाचा रस शुद्धीकरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, या उद्देशाने साखरेची गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन विभागातील मानव संसाधनांसाठी संस्थेने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचा पुरेपूर लाभ घेऊन त्यांच्या कारखान्यातील साखरेचा दर्जा सुधारून त्यांना नफ्यात नेण्यास मदत होईल, असे त्यांनी कारखान्यातील सहभागी कर्मचाऱ्यांना सांगितले. (बाईट )

Tags: