उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना , पावसामुळे सुखद दिलासा मिळाला आहे .
बेळगाव शहराचे तापमान ३७ अंशापर्यंत वाढले होते . कडक उन्हामुळे जनता हैराण झाली होती. मात्र काल आणि आज पडलेल्या पावसामुळे , उन्हाने त्रासून गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तसेच पशू-पक्षीही पावसाने सुखावले आहेत. काल आणि आज शहरात पावसाच्या हलक्या सरी कोळसळल्या . सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते . मात्र नंतर पावसाला सुरुवात झाली . यामुळे हवेत कमालीचा गारवा पसरला आहे .
कर्नाटक विधानसभेसाठी उद्या राज्यभरात सार्वत्रिक मतदान होणार असून बेळगावात आज मतदानाची सर्व तयारी करण्यात आली आहे.उद्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, पाऊस पडला तरी तेथे मतदानाची जय्यत तयारी केली आहे. कोणतीही समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे .
जिल्ह्य़ातील शेतकरी वळिवाची पावसाची अपेक्षा होती, मात्र काल आणि आज पडलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे . यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे . मात्र काही ठिकाणी या पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे .


Recent Comments